भारतात 1904 सालापासून सहकारी चळवळीने विविध क्षेत्रात पदार्पण केलेल्या आहे. सहकार चळवळ केवळ आर्थिक विकासाचे साधन न राहता ती सामाजिक सुधारणेचा एक सुवर्ण मार्ग आहे. सहकारी चळवळीत समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. सहकारी चळवळीत समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. सहकारी चळवळीत पुरुषाप्रमाणे महिलांचा सहभागही महत्त्वाचा आहे परंतु सहकारी चळवळीत महिलांचा सहभाग अगदी नगण्य असा होता.
देशाच्या सहकारी चळवळीचा विचार केल्यास महाराष्ट्र व त्यामध्येही कोल्हापूर जिल्हा सहकारी क्षेत्रात अग्रणी आहे करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर नगरीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने सहकारी चळवळीची सुरुवात झालेली आहे स्वतःहून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावणे मध्ये सहकारी बँकांचा सिहांचा वाटा आहे बँकिंग व्यवसाय मध्ये फक्त पुरुषांकरिता काम करणाऱ्या बँका कार्यरत होत्या मैदान करता स्वतंत्र बँक नव्हत्या महिलांमध्ये मुलांचं मुलाच बचत व काटकसरीची सवय असते त्यामुळे त्यांना बँकिंग प्रवाहात आणणे आणि त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे याकरता आर्थिक मदत करून स्त्री ही आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी कौटुंबिक सामाजिक व आर्थिक अशा सर्व स्थरात तिला पुरुषाच्या बरोबरीने हक्क मिळावा रूढी परंपरेच्या जोखडातून तिला मुक्त करावे आणि महिला विकासाचे स्वतंत्र व्यासपीठ निर्माण व्हावी हा महिला बँक स्थापन करण्याचा मुख्य उद्देश होता
‘महिलांना स्वावलंबी’ करण्याच्या आणि त्यांचा आर्थिक सामाजिक विकास करण्याच्या हेतूने कोल्हापूर शहरांमध्ये 19 मे 1972 रोजी कोल्हापूर महिला सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेची स्थापना झाली. बँक स्थापने वेळी सभासद सभासद संख्या 1400 भांडवल रुपये 54180 ठेवी रुपये 23600 इतक्या होत्या.
बँकेकडे कोअर बँकिंग, रूपे डेबिट कार्ड, पोज इत्यादी कॉमर्स आय एम पी एस मोबाईल बँकिंग, यु पी आय डेटा सेंटर, डीआर साईट, एस एम एस सुविधा, ईसीएस क्लिअरिंग, सी टी एस क्लिअरिंग नेफ्ट/आरटीजीएस, सीकेवायसी, आधार कार्ड संलग्न, अनुदान जमा करणे आणि मोबाईल ॲप द्वारे पिग्मी कलेक्शन इत्यादी सेवा सुरू आहेत.
आज पर्यंत बँकेत विविध पुरस्कार मिळाले आहेत सण 2018 मध्ये बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडून बँकेस महिला बँक गटातून सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचा “सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार 2018” मिळालेला आहे. तसेच बँकेच्या अध्यक्षा सौ. शैलजा सूर्यवंशी यांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने “श्रीमती सुशिला देवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार 2017” ने सन्मानित केले आहे.
तसेच कार्नाद्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने महिला बँक गटात बँकेच्या अध्यक्षा सौ. शैलजा सूर्यवंशी यांना “सर्वोत्तम अध्यक्षा” आणि बँकेस आर्थिक सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन करणारी बँक व सर्वोत्तम आर्थिक अहवाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बँकेच्या बिंदू चौक, हळदी, राजारामपुरी, गांधी नगर, हुपरी, खासबाग व शाहूपुरी या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. बँकेकडून महिलांबरोबर पुरुषांनाही बँकेच्या सर्व सेवा दिल्या जातात बँकेमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक ठेव योजना असून रुपये 5 लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे.
त्याचबरोबर बँकेकडे सोने जिन्नस तारण कर्ज, व्यापार -व्यवसाय तसेच लघु उद्योगाकरिता कॅश क्रेडिट कर्ज, आणि घर/फ्लॅट खरेदी, शैक्षणिक व प्रोफेशनल इत्यादी कर्ज योजना आहेत शहरी भागातील सर्व शाखांकडे लॉकर सुविधा उपलब्ध आहे.
बँकेचे मुख्यालय व शाखा खासबाग कार्यालय स्ववास्तूत कार्यरत आहेत. बँकेच्या सभासदांच्या ज्या पाल्यांनी इयत्ता 10 वी 12 वीच्या परीक्षेत 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत त्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचे कौतुक केले जाते. तसेच सभासद व त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या गंभीर आजाराचे उपचारासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी बँकेमार्फत आर्थिक मदत दिली जाते. जे सभासद एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतील त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्थांना आणि राष्ट्रीय आपत्ती मध्ये झळ पोचलेल्या आपाद ग्रस्तांना सामाजिक कर्तव्याच्या बांधिलकीतून बँकेने सतत मदत केलेली असते.
बँकेच्या अध्यक्षा शैलेजा सूर्यवंशी, उपाध्यक्षा माधुरी शिंदे, ज्येष्ठ संचालिका लतादेवी जाधव, मनीषा दमामे, सुनिता डोंगळे, जानकीदेवी निंबाळकर, तिलोत्तमा भोसले, भारती डोंगळे, सुधा इंदूरकर, मोहिनी घोटणे, मथुराबाई सुतार, जयश्री परमाळे, विजया जाधव, संयोगिता पाटील, महाव्यवस्थापक ज्योतीराम कुंभार आणि बँकेचे सर्व सेवक/अधिकारी या सर्वांनी एक संघटनेने केलेल्या कामामुळेच महिला बँकेचा नावलौकिक होत आहे
|