• 1082 KH, Tutuchi Bag, Khasbag Kolhapur-416012
  • Contact+91-231- 255 04 21
  • Mon - Fri: 11:00AM - 5:00PM

Awards and Recognition

बँकेच्या यशस्वी वाटचालीत विशेष उल्लेखनीय घटना

अ.नं.

वर्ष

तपशील

1

1992 1993

राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था अमरावती तर्फे सहकारी संस्था वार्षिक अहवाल राज्यस्तरीय मूल्यमापन स्पर्धेत प्रशस्तीपत्र

2

1992 1993

दैदिप्यमान प्रगतीबद्दल कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर तर्फे गौरवात्मक विशेष पुरस्कार

3

2007 2008

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांचेकडून बँकेचे वसुली अधिकारी श्री एम एस कुंभार यांना सर्वोत्कृष्ट वसुली अधिकारी पुरस्कार

4

2008 2009

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन कडून बँकेने कर्जाचे प्रमाण 0 टक्के केल्याबद्दल गौरव

5

2009 2010

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन कडून बँकेने कर्जाचे प्रमाण 0 टक्के केल्याबद्दल गौरव

6

23/9/2009

बँकेने शाहूपुरी कोल्हापूर येथे सातवी शाखा सुरू केली आहे

7

11/11/2010

महाराष्ट्र अर्बन को ऑफ बँक स फेडरेशन लिमिटेड मुंबई च्या वतीने बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला बँक गटातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

8

2010 11

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स वसुली अधिकारी संघटनेच्यावतीने बँकेच्या अध्यक्षा सौ लता देवी जाधव यांना वसुलीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरव

9

11/10/2011

महाराष्ट्र अर्बन को ऑफ बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई च्या वतीने बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला बँक गटातून सलग दुसऱ्या वर्षी तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलेली आहे

10

10/1/2012

महाराष्ट्र स्टेट को ऑफ बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने राजमाता जिजाऊ महिला सहकारी बँक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

11

23/4/2011

सहकार चळवळ वाढावी आणि सहकार चळवळ महिलांच्या पर्यंत पोहोचावी याकरिता बँकेने महिला गुणगौरव समारंभ माध्यमातून कर्तृत्ववान महिलांचा यथोचित गौरव व सत्कार केला केलेला आहे त्यामध्ये महिलांना सहकार्याची माहिती देऊन सहकाराचे महत्त्व पटवून दिलेले आहे

12

27/6/2013

बँकेने कोअर बँकिंग सेवेचा शुभारंभ केलेला आहे सर्व शाखांना आयएफसी कोड मिळाले आहेत त्याद्वारे आधार कार्डाशी संलग्न असणाऱ्या सेविंग खातेदारांना रेशन व गॅस अनुदान आणि विविध शासकीय निमशासकीय कार्यालये विमा कंपन्या अन्य बँका आणि वित्तीय संस्था यांचेकडून देय असलेल्या रक्कमा आणि आरटीजीएस व नेफ्ट द्वारे इंवर्ड फंडस थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा होण्याची तसेच फंडस पाठविण्याची सोय उपलब्ध झालेली आहे

13

18/4/2015

बँकेस सहकार भारतीचे मुखपत्र “सहकार सुगंध” यांचे वतीने महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका व पतसंस्था यांची साठी आयोजित केलेल्या प्रतिबिंब वार्षिक अहवाल स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र महिला बँक विभागातून द्वितीय क्रमांक पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे

14

10/10/2015

बँकेचे अध्यक्ष सौ शैलजा सूर्यवंशी यांना बँकिंग फ्रंटियर च्या वतीने बेस्ट चेअरमन या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

15

2016

महाराष्ट्र अर्बन को ऑफ बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचे वतीने बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला बँक गटातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

16

24/11/2016

अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने महिला सहकारी बँक विभागात प्रथम क्रमांकाच्या “बँको 2016” पुरस्काराने बँकेस सन्मानित करण्यात आले आहे

17

19/9/2017

अर्बन को ऑफ बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई च्या वतीने बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला बँक गटातून प्रथम क्रमांकाचा “सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार 2017” देऊन सन्मानित केले आहे

18

19/9/2017

बँकिंग फ्रंटीअर मुंबई यांच्या वतीने “2017 बेस्ट सीबीएस अपग्रेडेशन” पुरस्काराने सन्मानित

19

18/1/2018

अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने महिला सहकारी बँक विभागात प्रथम क्रमांकाच्या “बँको 2017” पुरस्काराने बँकेस सन्मानित करण्यात आले आहे

20

8/2/2018

बँकेच्या अध्यक्षा सौ शैलेजा सूर्यवंशी यांना दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई यांचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीमती सुशिला देवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार 2017 ने सन्मानित केले आहे

21

29/9/2018

महाराष्ट्र अर्बन को ऑफ बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई च्या वतीने बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला बँक गटातून सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार 2018 देऊन सन्मानित केलेले आहे

22

16/12/2018

कर्नाड बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने महिला बँक गटात बँकेच्या अध्यक्षा सौ शैलजा सूर्यवंशी यांना सर्वोत्तम अध्यक्षा आणि सन 2018 चा आर्थिक सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असणारी बँक व सर्वोत्तम आर्थिक अहवाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे